करूया सफर कोकणची
दापोलीच्या आंजर्ले गावाची
आंबे फणस कोकम काजूची
लज्जत अवीट गोडी चाखायची
बैलगाडीच्या खडखड आवाजाची
बैलांच्या खण खण घंटांची
मायेने बैलांना हाकायची
देवळाच्या दारात पोचायची
भजन आरतीत गुंगून रमायची
फुलांच्या वासात ,
कापराच्या उजेडात
ऒढ लावी देवदर्शनाची
सागराच्या लाटात डुंबायची
शंख शिंपले वेचायची
वाळूच्या किल्ल्यात गुंगायची
मजेत डुलत उंडारायची
गुदगुदी ढकलाढकली करायची
मस्त ही पोटपूजा करायची
कोकम सार आणि काजूची उसळ
तिखट मिठाची मस्त ती चंगळ
आमरस पुरीचा मिठास बेत
फणसाच्या गरयावर मारुया हात
दापोलीच्या आंजर्ले गावाची
आंबे फणस कोकम काजूची
लज्जत अवीट गोडी चाखायची
बैलगाडीच्या खडखड आवाजाची
बैलांच्या खण खण घंटांची
मायेने बैलांना हाकायची
देवळाच्या दारात पोचायची
भजन आरतीत गुंगून रमायची
फुलांच्या वासात ,
कापराच्या उजेडात
ऒढ लावी देवदर्शनाची
सागराच्या लाटात डुंबायची
शंख शिंपले वेचायची
वाळूच्या किल्ल्यात गुंगायची
मजेत डुलत उंडारायची
गुदगुदी ढकलाढकली करायची
मस्त ही पोटपूजा करायची
कोकम सार आणि काजूची उसळ
तिखट मिठाची मस्त ती चंगळ
आमरस पुरीचा मिठास बेत
फणसाच्या गरयावर मारुया हात
No comments:
Post a Comment